चीरहरण

Started by ujwal deshmukh, September 17, 2019, 03:18:35 PM

Previous topic - Next topic

ujwal deshmukh

बघुनी  समाजातील
माजलेला व्यभिचार
अश्रूही ना राहिले
रडण्यास दोन चार .....

मिळतात प्रेत रोज
बालिक नाबालीकेचे
एकवितो  आक्रोश
लचके त्या देहावरचे......

सांगून जाते घाव
पिडीताच्या हृदयाचे
मागतात पुरावे तिलाच 
बलात्कार झाल्याचे ....

न्याय मिळेल कसा
पट्टी बांधली न्याय देवतेने
नजरा दिपुनी टाकतात
लखलखत्या पैशाने .....

चीरहरण केले
माणसाने माणुसकीचे
प्रतिमेमध्येच अडकुणी राहीले
विचार थोर महात्माचे  .......
         .....उज्वल देशमुख  9860011632