खेड्यातील प्रेम

Started by ujwal deshmukh, September 17, 2019, 04:29:28 PM

Previous topic - Next topic

ujwal deshmukh

घरातल्या खिडकीतुन
ती मायाकळे पाये
माई छाती बी मंग
फुगून फुगून राये....

डोयाले डोया भिडला 
कि मुखुर मुखुर हासे
म्या इशारा केल्यावर
लाजून खाली बसे .....

राहे उभी दाठ्यात
वाट पाहत ती माई
मी मारो चकरा मंग
तिच्या घराभोवती लई ....

माया पिरमाचा झाला
मंग गावभर बोबाटा
दिलात नाव लिहून पोट्येन
रंगीवला वडाखालचा वटा .....

कालेजात बी पोट्टे मले
तिच्या नावाने हाक मारे
ती दिसली मंग त्यायले
तर वाहिनी अशी बोंब मारे ....

गोट गेली बापाजवळ
वाट  दावली  आमाले
पाठीवले तिले सासरी अन
मले इस्पितलात झोपिवले  .......

गावतल्या पिरमाची गोट
नाही संपत आताच इथवरी
बापच दाखीवते नातवाले मामा
पोरगी  आली कि माहेरी......
                  .......उज्वल देशमुख 9860011632