उंबरा

Started by Dnyaneshwar Musale, September 20, 2019, 09:03:15 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

तो शिकवत राहिली
तिला
त्याच्या  सारखं जगायला,
उंबऱ्याच्या आतच कोंडुन ठेवलं
तीच बाईपण,
पण
चावडी वरती  जगाला ओरडुन शिकवत
होता  माणुसपण.

गीर गीरक्या घालुन
स्वप्न टाकली  त्याने  तिची चिरून,
चवकटीतच ती रडत राहिली
एकदातरी लख्ख प्रकाशात
तिलाही वाटायचं चारचौघीत यावं फिरून.

काय हवं होतं असं तिला
ना कुठला हट्ट, ना कुठली आवड
समजुनच घेतली नाही तु
देऊन तिला सवड,
डोळ्यांच्या फडफडण्याऱ्या पापण्यांना
शांत ठेवुन
आता बघ तिच्या कडे
तरी तीच समजुन घेईल तुला,
जमलीच तु ही अवगत कर तिची कला.