मी औरंगजेब बोलतोय

Started by Tejaswita Khidake, September 23, 2019, 08:39:09 PM

Previous topic - Next topic

Tejaswita Khidake

नैतिकतेच्या दृष्टीकोनातुन मी अत्यंत चारित्र्यसंपन्न

कुराणा ची आयत लिहुन मी स्वखर्च भागवायचो

राज्यविस्तारासाठी मी कित्येक लढाया लढलो

माझ्या मृत्यूपर्यंत माझ्या साम्राज्याचा मीच शासक होतो

माझे साम्राज्य सर्वशक्तिशाली मानले जात होते

कारण माझे राज्य अति विशाल होते

लढाईत एका हत्तीच्या पायदळी आलो

आणि तरीही मी लढत राहिलो

शत्रूंशी अन मृत्युशी झुंज देत राहिलो

मी माझ्या साम्र्याजाचा एक निडर योद्धा होतो

माझा असा विश्वास होता की जर तुम्ही न लढताच शत्रुसमोर हार मानत असाल

तर तुमच्या पेक्षा वाईट अन मुर्ख कोणीच नाही

इतिहासकारांना यात काडीमात्र ही शंका नाही की मी

एक महान सम्राट होतो, आणि माझ्या वेळी माझ्या साम्राज्याच्या समृद्धीचा सुवर्ण युग होता

मी लाहोर ची बादशाही मशजीद बनवली

मी बीबीका का मकबरा बनवला

मी मोती मशजीद बनवली

मी इतिहासातला एक सर्वात सशक्त आणि शक्तिशाली राजा मानलो जातो

मी अखंड भारत बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता

आणि हो मीच माझ्या स्वतः च्या वडिलांना नजरकैदेत ठेवले होते

आणि त्यांच्या मृत्युचे कारण देखील मीच होतो ज्याचे मला लेशमात्रही दुःख नाही

कारण मी पुरू नाही मी यदु होतो

होय मी औरंगजेब बोलतोय ..

© तेजस्विता खिडके


dhanaji

wow simply amazing...But औरंगजेब ek bhayanak vyakti hota !!!