कविता

Started by गायत्री सोनजे, September 28, 2019, 01:09:17 AM

Previous topic - Next topic

गायत्री सोनजे

माहेरचा  पारिजात


माहेरचा पारिजात
बहरला अंगणात
दरवळे सुगंधाने
सृष्टीच्याच कुंचलात.....॥१॥

घन मथाचे अंगण
भिजवावे अंतरंग
सोडवेना मजला रे
तुझ्या आठवाचे रंग.....॥२॥

वाटे जीवाला निवांत
डोळे भरुनी बघावे
भेटण्यास तुला कधी
एकवार तरी यावे....॥३॥

नाते माझे जुळवून
माहेराला थांबलास
येता माहेराला कधी
सज्ज असे स्वागतास.....॥४॥

शांत अशा सांजवेळी
अंगणात पसरावा
रम्य अशा समयासी
थोडा विसावा घ्यावा.....॥५॥

*सौ गायत्री सोनजे, नाशिक*







[/b][/b]