कविता

Started by गायत्री सोनजे, September 28, 2019, 01:14:20 AM

Previous topic - Next topic

गायत्री सोनजे

सूर प्रेमाचे
कसे जुळले
तुझ्याकडेच
मन वळले....
सूर प्रेमाचे
तुच गाईले
नजरेने हया
घायाळ केले....
अंतर प्रेमाचे
खुपच वाढले
नकळत मन
व्याकूळ झाले....
गंध प्रीतीचा
सुरात फुलला
अंतरिक्ष क्षण
मी अनुभवला....
व्याकूळ करते
जिवाला किती
जपूया मिळून
प्रेमळ नाती....

*सौ गायत्री सोनजे,नाशिक*
२१/९/२०१९...(११.४०pm)