मन आभाळ झालं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, September 28, 2019, 12:28:44 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.मन आभाळ झालं*

मन आभाळ झालं तुझ्या प्रेमात न्हालं
तुझ्या लाजण्यांनं सखे रूप बहरून आलं

तुला पाहिलं मी
पुरता वेडा झालो
सांजवेळी आडोशाला
चोर पावली आलो

तुझं लाजन सखे मी कैद हे केलं
मन आभाळ झालं तुझ्या प्रेमात न्हालं
तुझ्या लाजण्यानं सखे ........

मधाळ पुरणाची
सखे पोळी तू गं
भीक घाल पामराला
प्रेमानं भर झोळी तू गं

मी रात भर जागा कोंबड आरवून मेलं
मन आभाळ झालं तुझ्या प्रेमात न्हालं
तुझ्या लाजण्यानं सखे..........

बांधवरचा घास तू
मी अवताचा बैल
ओढू नको दोर तू
कर मिठीची गाठ सैल

तुझ्या श्वासांच गणित झालं आता फेलं
मन आभाळ झालं तुझ्या प्रेमात न्हालं
तुझ्या लाजण्यानं सखे ............

तू चंदनाची शाई
मी कागद प्रेमाचा
लिहू चल दोघे आता
पाढा संसारी दोघाचा

तू लावून वेड का काळीज चोरून नेलं
मन आभाळ झालं तुझ्या प्रेमात न्हालं
तुझ्या लाजण्यानं सखे.......


✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर