स्त्री शक्तीचा जागर

Started by गायत्री सोनजे, September 30, 2019, 01:32:46 AM

Previous topic - Next topic

गायत्री सोनजे

स्त्री शक्तीचा जागर*

मातृत्वाचे ममत्व हे
सांभाळूनी मी घेतले
नारी शक्तीचे पूर्णत्व
स्वतःत मी जागविले....

घर, संसार, नोकरी
सर्वागीण पार केले
चंद्रावर जाऊनिया
नवे आकाश निर्मिले....

हिणवले सगळयांनी
तुच आहेस अबला
धैर्यवान नारीचाच
इतिहास हा घडला....

आज या जगात आहे
हिरकणी , नारायणी
रौद्र स्वरूपातली ती
दुर्गादेवी मृगराणी....

स्त्रीच्या शक्तीचा जागर
दाही दिशांना दिसला
तिच्या अनेक रुपांनी
छळवाद संपवला...

*सौ गायत्री सोनजे,नाशिक*
[/size]