ती, तिच्या प्रेमात कसा पडलो??

Started by Amrut dabir 123, October 02, 2019, 11:46:49 AM

Previous topic - Next topic

Amrut dabir 123

"ती"

प्रेमावर मुळी विश्वासच नाही, असा होतो मी
एका वादळवाऱ्या सारखी, मझ्या आयुष्यात आली ती

आणि मग काय.....

तास आणि तास तुझं, ऐकत राहावास वाटत
नाही बोललीस तरी, तुझ्याकडे पाहत राहावस वाटत

तुझा हात हातात घेतो तेव्हा, वेळच जणू थांबून जातो
आयुष्यातला सगळा ताण, तुझ्या पडद्याआड होऊन जातो

कधी वाईट नको, वाटून घेऊस तू स्वतःबद्दल
जर कधी काही वाटलं, तर ऐक माझ्याकडून तुझ्याबद्दल

सारखा सारखा हसतो, उगीच दुःख लपवतो मी
कळलं ही नाही ग, कधी तुझ्या प्रेमात पडलो मी

तू जाताना बघत राहतो, जो पर्यंत दिसतेस तू
डोळ्यात भरवून ठेवतो, आता स्वप्नातच तर भेटशील ना तू

प्रेम काळजी कधी, दाखवता नाही आली ग मला
रोज वाटायचं, कधी ना कधी तरी कळेलच तुला

वाईट वागलो तुझ्याशी मी, तुला माझी सवय झाली असती
पण तुझ्याशी तुटक बोलतांना, नाही गहीवरली तर ती माझी छाती कसली ?

माहीत होतं हातातून, निघून चालली होतीस तू
दुसऱ्याचाच प्रेमात आता, छान रमली होतीस तू

तुझे ते डोळे आणि ते गुलाबी गाल बघतांना, कधीच नाही थकलो
पण शेवटी नशिबाने हरलो, तुला काही सांगू नाही शकलो

रोज हाथ मिळवून निघून जातेस, मी मात्र तिथेच राहतो
तुझ्या त्या गोड स्पर्शात, मी फक्त वाहवत जातो

सुर्य जेव्हा मावळतो, तेव्हा त्या प्रकाशात तूच दिसतेस
पसरलेल्या त्या किरणांमध्ये, जणू काही तूच हसतेस

तू भविष्यात भेटशील की नाही, हे मला माहित नाही
पण तुझ्या या आठवणी, वेळ पण हिराऊन घेऊ शकणार नाही

मोक्ष नको रे देवा, मला परत एक जन्म दे
फक्त एवढेच उपकार कर, की तिचा मला संग दे

फक्त एवढेच उपकार कर, की तिचा मला संग दे
 
~अमृत डबीर