खर प्रेम आणि "अमृताचे मरण आणि विषाला विषबाधा"

Started by Amrut dabir 123, October 02, 2019, 11:58:39 AM

Previous topic - Next topic

Amrut dabir 123

"अमृताचे मरण आणि विषाला विषबाधा"

"काही पण करेल मी तुझ्यासाठी",  माझ प्रेम आहे तुझ्यावर...

"विसरून जा मला!" ती म्हणाली, रूतल खोल ते माझ्या मनावर..


धन्य आहेस रे तू देवा, तुझी लीला जगाहून निराळी

तूला-मला जवळ आणण्यासाठीच, तर नाही ना रे ती अस म्हणाली ?


जणू अमृतालाच मरण यावे, आणि विषालाच विषबाधा व्हावी

हसत हसत मला नियती म्हणाली, तिच्या आनंदाची तू हिच किंमत द्यवी....


नारायणा असा कसा, तूझा कर्माचा न्याय एतका कठोर असावा ?

की तिच्यावरच्या प्रेमा, खातर मी त्याच प्रेमाचा त्याग करावा?


मी त्याच प्रेमाचा त्याग करावा???

©अमृत डबीर