आपला माणूस

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, October 03, 2019, 06:46:34 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*माझी एक प्रेरणादायी कविता*
*कवितेचं शीर्षक.आपला माणूस*

या नात्यात ना त्या नात्यात
भेटत नाही आपला माणूस
दुःखांच्या गर्तेत असतो आपण
तेव्हा खेटतं नाही आपला माणूस

लाख दुश्मण असले जरी
रेटत नाही आपला माणूस
बाजूला रहदारी रोज असते
तरी बोलत नाही आपला माणूस

गोतावळा जमा होतो माणुसकीचा
मिसळत नाही आपला माणूस
एकच रंग आहे रक्ताला आपल्या
समजत नाही आपला माणूस

जेव्हा जातीवरून भांडण होतात
तेव्हा कळत नाही आपला माणूस
एखादा शेतकरी फास घेतो वेशीवर
पाहून का पळत नाही आपला माणूस

वाटण्या आई बापाच्या एक दिवस
जुळवत का नाही आपला माणूस
कळलं नाही कधीच मी कोणत्या धर्माचा
माणुसकी धर्म टाळत असतो आपला माणूस

खांदे देणारे तिरडीला माझ्या दुसरेच
का खांदा देत नाही आपला माणूस
लक्ष असुद्या जरासं माझ्या वर ही
वर गेल्यावर परतत नाही आपला माणूस

हं बस्स झाल्या बढाया अमोल तुझ्या
आता हात ही मिळवत नाही आपला माणूस
तिरस्कारित वृत्ती समाजात वावरते
इथेच संपत असतो आपला माणूस

✍🏻(कवी. अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Bapu Ambikar

खूपच सुंदर कविता....