विसरलास का तू स्वतःला?

Started by Amrut dabir 123, October 08, 2019, 11:52:15 AM

Previous topic - Next topic

Amrut dabir 123

"विसरलास का तू स्वतःला?"

माया मोहापूढे हात टेकून, भ्याड पणे काय रडतोस?
विसरलास का तू स्वतःला, माझा भक्त म्हणावीतोस!

काय होतास तू , काय झाली तूझी अवस्था लाजीरवाणी?
विश्वास ठेव माझ्यावर, आणि आठव ती महाभारताची कहाणी...

तुझ्या प्रेमाला बघ, तो भित्रेपणा म्हणुन हिणवतोय
तुझ्या ह्या मिथ्या दयेने, तुझा तूच सर्वनाश करतोय!

ते पहा क्षितीजा वरून त्रैलोक्य प्रक्षाळत, अदीतीचा पुत्र येतोय....
त्याच्या कृपेने पहा तुझ्या रथाचा झेंडा, कसा तेजाने तळपतोय.....

चहु बाजुंनी फक्त, नगाडे आणि शंखनादाचाच ध्वनी घुमतोय.....
आता तरी उठ, बघ साक्षात मुर्तीमंत विजय तुला बोलवतोय......

तुझ्या शत्रुने तूला ओळखले नाही, म्हणून तो मातला आहे
वळुन तर बघ तुझ्या पाठी, त्रैलोक्याचा स्वामी उभा ठाकला आहे !!!!

~©अमृत डबीर