बेधुंद रात्र..

Started by Rushi_kendre_, October 10, 2019, 07:14:17 PM

Previous topic - Next topic

Rushi_kendre_

सायंकाळच्या सूर्यास्तानी
समोर वेळ रात्रीची आली
लख्ख प्रकाश चांदण्यांनी
नभी रूप दाविले चंद्रानी
बेधुंद करणारी रात्रही साली
लहर प्रेमाची घेऊन आली


त्यात मनाला चाहूल झाली
एक सजणा एक साजणी
प्रेमळ शी ती प्रेमकहाणी
थंड हवेच्या झोक्यांमधूनी
सूर सूनावती प्रेमळ गाणी
बेधुंद करणारी रात्रही साली
लहर प्रेमाची घेऊन आली


रातकिड्यांची किरकिर न्यारी
काजव्यांचाही प्रकाश भारी
हसत हसत सजनाला पाहत
झुल झुलती झोपाळ्यावरती
बेधुंद नशा वेगळा त्यात
खळी खुलली गालावरती
बेधुंद करणारी रात्रही साली
लहर प्रेमाची घेऊन आली


नयनरम्य से रूप देखणे
त्यात लाजरा भावही भारी
नजरेस नजर भिडू लागली
हृदयी ही धडधड वाढली
मुष्कीलशा या संकटकाळी
साजनाचीही बारी आली
बेधुंद करणारी रात्रही साली
लहर प्रेमाची घेऊन आली


तोडूनि सारे बंध जगाचे
निरागस या स्वच्छंद मनानी
अंतरही ते दूर केले
त्या दोघांच्या गोष्टींमधूनी
गळाभेटीची वेळ ही आली
एक सजणा एक साजणी
प्रेमळ शी ती प्रेमकहाणी
बेधुंद करणारी रात्रही साली
लहर प्रेमाची घेऊन आली..

         :- RUSHIKESH KENDRE
            8888288846