तू करीतच राहा माझ्यावर आरोप...

Started by @गोविंदराज@, October 11, 2019, 02:56:55 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

तू करीतच राहा माझ्यावर आरोप...
जरी घेत असेल मी या जगाचा निरोप...

मी मान्य करतोच कि मी कमी पडलो...
पण तुझ्यासाठीच नाही का मी जगाशी नडलो...
पण तुझे चालूच राहिले प्रत्यारोप....
तू करीतच राहा माझ्यावर आरोप...
जरी घेत असेल मी या जगाचा निरोप...

स्वप्नांची रांगोळी माझ्याही झालीच कि...
बदनामीच्या डोहात अब्रू माझी वाहिलीच कि...
कमी नाही केला तू माझा डोक्यावर खापरांचा टोप...
तू करीतच राहा माझ्यावर आरोप...
जरी घेत असेल मी या जगाचा निरोप...

माझ्या अस्तित्वाची निघाली धिंड...
कुठली लढवयाची होती तुला खिंड...
त्या खिंडीत वाढलं जरी नामुस्कीचं रोप...
तू करीतच राहा माझ्यावर आरोप...
जरी घेत असेल मी या जगाचा निरोप...

तुझा नजरेत नेहमीच वाईट ठरत आलो...
क्षणो क्षणी जरी मी झुरत आलो....
तुझ्या मनातून पावत आलो लोप...
तू करीतच राहा माझ्यावर आरोप...
जरी घेत असेल मी या जगाचा निरोप...

जगाशी हरलो नाही, तुझ्यापुढे झुकलो..
तुला जाणीव झालीच नाही मी कुठं किती वाकलो...
अजून हि घेतेस तू माझ्या चुकांचा शोध..
तू करीतच राहा माझ्यावर आरोप...
जरी घेत असेल मी या जगाचा निरोप...

बेहाल अशी माझी स्थिती...
माझ्याच मरणाची मला आता भीती...
मला जगवण्याचा तुझा हा खटाटोप...
तू करीतच राहा माझ्यावर आरोप...
जरी घेत असेल मी या जगाचा निरोप...

सहन करावी किती विटंबना...
मिळेल दाद मला किंबहुना...
सुटकेसाठी आहे माझा सुरु खटाटोप...
तू करीतच राहा माझ्यावर आरोप...
जरी घेत असेल मी या जगाचा निरोप...

कित्येक वर्ष झालं मनाला आराम नाही...
पटलं नाही तुला अजून कि मी हराम नाही...
माझ्यावर नेहमीच तुझ्या अविश्वासाचा कोप...
तू करीतच राहा माझ्यावर आरोप...
जरी घेत असेल मी या जगाचा निरोप...

माझं नियंत्रण आता माझ्यावरून सुटलंय..
जीवनाचं गणित च जणू आता खुंटलंय...
घेऊ दे आता तरी मला शांत झोप....
तू करीतच राहा माझ्यावर आरोप...
जरी घेत असेल मी या जगाचा निरोप...

.....@ गोविंदराज @ 11.10.2019