नव्याच चैत्रमाशी

Started by Ramkrishna Wankhede, October 13, 2019, 09:04:22 AM

Previous topic - Next topic

Ramkrishna Wankhede

नव्याच चैत्रमाशी,नवेच रंग ले तू ,
नव्याच चेतनेचे,नवेच रुप हो तू

नव्याच संपदांना,सन्मान दे नव्याने ,
नव्यातून नव्यांचा,नवाच शोध घे तू ,

नव्याच क्षितिजाचा,नवाच हा पसारा,
नव्याच किरणांनी,नवीच झेप घे तू ,

नव्याच जिवनाला,नव्याच यौवनाला,
नव्याच उमंगाने,नवीच साज दे तू ,

नवाच युग वारा,खुणावतो नव्याने,
नव्याच पावलांना,नवीच वाट दे तू ,

नव्याच आक्रमाची,नव्याच विक्रमाची
नव्याच या घडीला,नवीच नोंद घे तू,

नव्याच कल्पनांना,आकार दे नव्याने,
नव्याच दालनाचे,नवेच अंग हो तू ,

नवाच पायवा हा,नवा तुझा मनोरा,
नव्याच शिखराला,कळसास ने नव्या तू ,

नव्या तुझ्या स्वरांची,मैफिल रंगू दे नवी,
नव्याच रागदारी,नव्या स्वरात गां तू ,

नवा बहर तुझा,नव्याच स्वागताला,
नवा सुगंध ऐसा,नव्या मनात हो तू ,

राज वानखेडे
9921620345