हेच कदाचित प्रेम असतं....

Started by Vaibhav3799, October 15, 2019, 01:26:07 PM

Previous topic - Next topic

Vaibhav3799

प्रेम म्हणजे असं असतं,
श्वास तुझा प्राण माझा,
नजर तुझी दृष्टी माझी,
साथ तुझी आधार माझा,
सुख तुझं आनंद माझा,
दु:ख तुझं अश्रू माझे,
ओढ तुझी प्रीत माझी,
हाक तुझी साद माझी,
प्रेम म्हणजे नक्की काय असतं,
हे तुला भेटून समजलं,
माझे जीवनच बदलून गेलं,
जिथे तुझं माझं काहीच नसतं ,
जे काही आहे ते आपलं असतं, 
हेच कदाचित प्रेम असतं.... 
हेच कदाचित प्रेम असतं....