सीता

Started by Sanjeev Pathak, October 16, 2019, 05:23:57 PM

Previous topic - Next topic

Sanjeev Pathak

सीता ह्या कवितेत श्री. रामांच आपल्या पत्नी सीते वद्दलचं मनोगत व्यक्त केले आहे. श्री. रामाला सीते विष्यी वाटणारं प्रेम, आपुलकी व काळजी तुन निर्माण झालेली ही एक सुंदर रचना आहे.आजच्या ह्या युगात सुद्धा त्यांना सीतेची खूप आठवण येते आणि ती प्रत्येक घरात आहे असा भास होतो, आणि म्हणुनच ते घरातल्या प्रत्येक रामाला आपल्या सीतेची काळजी घ्यायला सांगत आहेत.

हि कविता माझी पत्नी सौ. सारिका पाठक हिने लिहिलेली आहे

सीता...

बघताच क्षणी भावली, बागेत होती पाहिली,
स्मरणात ती राहीली, अंतरात होती स्थिरावली..

जनकच्या राजकन्येला, अयोध्येत मी आणले,
दशरथ पुत्र राम मी, सीतेला सहचारिणी होते मानले...

काय वाटले असेल नव वधूला, जेव्हा कळले असेल हे तिला,
वनवासात चौदा वर्षे, जावे लागेल तिच्या आर्यला...

शब्द एकही न बोलता, आधी पुढे पाऊल टाकला,
मी आहे तुमची सावली, ठाम निर्णय तीने घेतला...

जनक पुत्री अयोध्येच्या राणीला, क्षण एकही नाही लागला,
सोडून सगळे संग तीने, वनात माझ्या बरोबर यायला...

अलंकार,शृंगार त्यागीले, साधे वस्र परीधान सतीने केले,
पतीव्रता धर्मला सर्वप्रथम ठेवले, आलेल्या परिस्थितीला अंगीकारले...

‌चीत्रकुट पर्वतावर, मंदाकिनीच्या तटावर, एका पर्णकुटीरात राहिली,
सेवा, भक्ती करत, नाव माझे स्मरत, साध्वीच जणू ती जाहली...

कोण दूष्ट सुवर्ण मृग होता, जो माझ्या मैथिलीला भावला,
मी त्याच्या मागे धावता, बहुरुपी लेंकेशाने, हरण केले माझ्या सीतेला...

दुःखाच्या अथांग सागरात, असह्य होऊन वाट पाहत,
अश्रुंच्या प्रत्येक थेंबा थेंबात, कळकळीने मारत होती हाक,
अखेरीस मी सफल झालो, जानकीला परत घेऊन आलो...

पण..
गृह प्रवेश करण्या आधी, प्रवेश केला अग्नीत तीनी,
परिक्षा चारीत्र्याची, नाही चुकली विष्णुच्या पत्नीलाही...

अयोध्येची प्रजा मात्र यवढ्यावर नाही थांबली,
सुख बोचता, रयतेनी, चारित्र्यावर चर्चा आरंभली...

राखण्या प्रजेच्या मनाला, मी क्षण एकही नाही दवडला,
नुकतेच सावरत असलेल्या, सीतेला परत पिडा द्यायला...

निशब्द होऊन शांत झाली, हताश होऊन बसली खाली,
हात जोडून रडु लागली, नेत्रजलाच्या वाहण्यानी शरयूला पण भरती आली...

मी कठोर काळीज भासवले, रथात तिला बसविले,
ह्रदयाचे रुदन मी आवरले, राजाचे कर्तव्य बजाविले...

माझी सीता निघून गेली, चुक नसताना तिने शिक्षा भोगली,
काही केल्या मग नाही आली, धरतीपुत्री अवनी मध्ये धसुन गेली...

आजही मी तिचे स्मरण करतो, सीतेला घरा घरात पाहतो...

सुख-दुःखात, यश अपयशात, साथ देते ती तिच्या रामाला,
सावली सारखी मागे उभी, नाही चुकत कधी कर्तव्याला...

रामच सांगत आहे, तुमच्यात असलेल्या रामाला,
माझ्या चुकिचा इतिहास, नको आता गिरवायला...

धीर, प्रेम, पाठिंबा, नका विसरु तीला द्यायला,
थट्टा मस्करी, तक्रारी, चार भिंतीतच हव्या राहीला,
माझ्या सारखे चुकूनही चुकू नका, सांभाळा आपल्या सीतेला...

कवितेची Youtube Link खाली दिली आहे, कृपया सर्वांनी Like 👍🏻 करा व Channel ला Subscribe करा

https://youtu.be/Ap8s38jFJFg