खोलवर

Started by Dnyaneshwar Musale, October 16, 2019, 11:22:12 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

कविता अशी तशी फुकट नाहीच येत जन्माला
तिच्या पायामुळा पर्यंत कुणी पोहचतच  नाही
तिथं असतो फक्त अंधार
शब्द जन्म घेतात आणि कविता सुरू होते
सांडून रक्त अन ओतुन डोळ्यातुन आग
मग  समजतच नाही कधी बुडून जातो तो चंद्र अर्धा,
पळवाटा नसतेच
असते फक्त
एका नव्या प्रकाशा सोबत जगण्याची स्पर्धा,

इथं चतकोर भाकरी पायी घामाचा पाठ
रोजच वाहताना दिसतो,
कितीही काटकसर केली तरी
रुपया कुणा न कुणाकडे गहानच असतो.

उकळत्या पाण्यातुन वाफा निघाव्यात
तशा लोक तोंडातुन वाफा सोडतात,
बोलाव काय ,चार चौकटीतला गुण्या गोविंदाचा संसार लोक
उघड्यावर आणून मोडतात.

भाकरीचा प्रश्न तर जाउद्याच
पण आता
फुकटचा फक्त ऑक्सिजन मिळायचा
तो ही आता नेलाय ओ कुणी चोरून
उघड्या माळाक पाहिलंकी
वाटतं
माणसातल माणूसपणच चाललंय काय मरून,

झाकलेल्या प्रश्नांवर अजुन तेल मीठ  लावुन पांघरून टाकायच
आपल्या ला काय घेणं म्हणतं
त्यावरच दोन दोन तास भाषण ठोकायच,
आपल्याला उत्तरे सापडत नाही
आपण आपलं ओझं अंगावरच  सोसायच.


सावरायच परत स्वतःलाच,
मग
लेखणीला टोपण लावुन
कविता वाचायची,
प्रवास पुन्हा चालु
जगण्यासाठी पुन्हा आपण आपलीच घासायची.

एवढ सहन करून कुणी म्हटलं तुझी कविता अशी कशी
पण मी जरी शांत असलो तरी कविता नाही ना ओ शांत बसु देत तशी.