शांतता

Started by AMRAPALI, October 17, 2019, 11:06:24 PM

Previous topic - Next topic

AMRAPALI

शांतता
अंधकरात जिचा भास होतो, ती फक्त आणि फक्त शांतता |
कधी कधी जिवावर बेतते, ती आहे शांतता|
काहींच्या आयुष्यात नसते, ती शांतता|
काहींच्या आयुष्यात असते, ती फक्त आणि फक्त शांतता|
का कुणास ठाऊक कुठे हरवली आहे ती शांतता?

मनुष्याच्या मस्तकात वाईट विचार आणते ती शांतता|
मनुष्याला सगळे वाईट विचार विसरायला लावते ती शांतता|
दुसऱ्याला मदत करून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्या हृदयाला मिळते ती शांतता|
का कुणास ठाऊक कुठे हरवली आहे ती शांतता?

आईच्या मायेेत असते ती शांतता, तर वडिलांच्या छायेत वावरते ती शांतता|
बहीण- भावाचे भांडण झाल्यावर सर्व काही व्यवस्थित होते ती शांतता|
का कुणास ठाऊक कुठे हरवली आहे ती शांतता?

पक्षांचा तो किलबिलाट ऐकुन कान अगदीं मंत्रमुग्ध होतात ती शांतता|
निसरगसौंदर्य पाहून त्यात कायमच विलिन होऊन जावं अशी शांतता|
प्राणीमात्रांना जिव्हाळा लावून त्यांची सेवा करण्यात मिळते ती शांतता|
पण का कुणास ठाऊक कुठे हरवली आहे ती शांतता?
आम्रपाली :)