तुम्हाला काय त्याचे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, October 18, 2019, 10:49:22 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तुम्हाला काय त्याचे*

जरी एकटा कधी असलो तुम्हाला काय त्याचे
गर्दीत विरहाच्या हरवलो तुम्हाला काय त्याचे

वाट लागली आहे जीवनाची वाट तिची पाहून
जगतांना जर कधी मेलो तुम्हाला काय त्याचे

शाळेत जातो दुःखाच्या रोज सुख शोधायला
तेव्हा व्यसनाशी जुळलो तुम्हाला काय त्याचे

कधी काळी होतो गळ्यात ताईत ज्यांच्या मी
त्यांच्याशीच आज हरलो तुम्हाला काय त्याचे

एक दिवस वाटलं मला मागे येईल ती पुन्हा
आली नाही ती तर रडलो तुम्हाला काय त्याचे

असे वादळ आले जीवनात माझ्या वेगळेच
त्या वादळात अडकलो तुम्हाला काय त्याचे

तू आली नाही तरी जळणार आहे देह माझा
जळतांना ही रखडलो तुम्हाला काय त्याचे

असंच असत रे प्रेमात मित्रा जरा जपून रहा
जपणाराच आग लावतो तुम्हाला काय त्याचे

कोणाला ठाऊक तो आग लावणारा शेवटी
आरं आतून जो जळतो तुम्हाला काय माहीत

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर