तुझी आठवण

Started by @Rushikesh, October 19, 2019, 06:47:41 PM

Previous topic - Next topic

@Rushikesh

तुझी आठवण

कसं सांगू तुला तू मला किती आवडते
या शहरातल्या गर्दीत तुझीच आठवण मला सावरते.

तसा असतो मी माझ्या कामाच्या घाईत
पण एवढ्या घाईत सुद्धा माझं मन
एकदा तरी तुझ्या आठवणी ने बावरते.

ही रात्रीची हवा जरी माझ्या डोळ्यांना
अलगद स्पर्श करून निघून जाते
पण तरी त्या डोळ्यांतल्या अश्रू
मध्ये तुझी आठवण वावरते.

या खुल्या आकाशा मध्ये लख प्रकाशनारी चांदणी जणू काळ्याशार ढगांना खुणावते
तसा मी सुद्धा कधी कधी रात्री चालत असताना
रस्त्या च्या कढेला घेतो विसावा कारण
तुझ्या आठवणीने माझे हृदय गहिवरते.

कसं सांगू तुला तू मला किती आवडते
या शहरातल्या गर्दीत तुझीच आठवण मला सावरते.