तू....

Started by Vaibhav3799, October 21, 2019, 05:19:03 PM

Previous topic - Next topic

Vaibhav3799

माझे सर्वस्व तू ....
माझा श्वास तू ,
माझे मन तू ,
त्यातील भावना तू ,
माझे शरीर तू ,
माझे काळीज तू ,
समजले तर परिपूर्ण जीवन तू ,
नाहीतर माझे अपूर्ण जीवन तू ,
माझ्या डोळ्यातील अश्रू तू ,
तुला नेहमी शोधत असते ती
नजर म्हणजे तू , 
क्षण क्षण तुझा विचार म्हणजे तू ,
शब्दात न मांडता येणाऱ्या भावना तू ,
तुला फक्त डोळे भरून बघण्यासाठी,
वर खाली होणारा जीव म्हणजे तू ,
तू दिसताच चेहऱ्यावर येणारे हास्य तू ,
आणि कधी दिसलीच नाहीस तर,
चेहऱ्यावरची ती निराशा तू ,
हृदयातील वेदना तू ,
हृदयातील दु:ख तू ,
हृदयातील प्रेम तू ,
तू येणार कि नाही हा विचार करून,
अर्धा जीव जातो त्या मागचे
कारण म्हणजे फक्त तू ,
पोटात भितीचा गोळा येतो,
ती मनातील भिती म्हणजे तू ,
माझी सुरवात हि तू ,
माझा शेवट हि तू ,
कसे सांगू काय आहेस तू ,
Feel  My Love....