सखी

Started by sanjweli, October 25, 2019, 02:23:29 PM

Previous topic - Next topic

sanjweli

प्रिये सखये .......
बघ  ना....! काही गोष्टी घडत असतात.....
कळत.....न्.........कळत
आतल्या........आत....... .
माझ्यातही....अन् .....तुझ्यातही.......
वादळे उठत असतात......
पण तो शांत सागर बघ ना!!!!
त्यालाही भरती ओहोटी आहेच ना?
अगदी शुन्य हो......
माझ्या डोळ्यात पहा.....
प्रेमाची व्याख्या नीटशी समजुन घे!!!!!
आपले  मार्ग वेगळे आहेत
वाटा वेगळ्या आहेत

माझ्या ओंजळीतला चंद्र
ते रुपडं आता माझं नाही.......
लावण्याचा तो दिमाख
माझ्या अंगणात नाही
थकलेल्या तिन्ही सांजा
मावळतीचा तेजोमय गोल
पुरता क्षितिजापार गेलाय
पण आपल्या प्रेमाची गुलाबी लाली
सा-या आसमंतात पसरलीय
अगदी तशीच गतकालच्या स्मृतींसारखी
बघ तुला आठवतंय का काहीतरी?

©-मवि
९४२२९०९१४३
sanjweli.blogspot.com