दिवाळी येता दिवाळी नवा उत्साह येतो रागद्वेषांची जळमट स्वच्छ झाडून टाकतो पंचपक

Started by smadye, October 27, 2019, 02:10:53 PM

Previous topic - Next topic

smadye

दिवाळी

येता दिवाळी नवा उत्साह येतो
रागद्वेषांची जळमट स्वच्छ झाडून टाकतो

पंचपक्वान बनवण्याची मजा निराळी
थकवा नाही , दगदग काही वाटत नाही

कारण आपल्याला हे माहित असते
पंचपक्वान नाही तर आनंदाची, सुखदुःखाची हि देवाण घेवाण असते

पूर्वजांपासून चालत आली हि संस्कृती आगळी
आपुलकीच्या नात्याची हि नाजूक वीण वेगळी

अनेक दीप प्रज्वलित अंगणी  माझ्या
शांत मंद समाधानाच्या ज्योती उजळल्या

दीप प्रकाश फक्त नाही माझ्या अंगणात
इतरांचे अंगण देखील होते प्रकाशमान

नाना रंग भरून रांगोळ्या सजल्या
आनंदाची उधळण व्हावी हा संदेश देत आल्या

फटाक्याचा गडगडाटात विरले राग द्वेष सारे
आली दिवाळी चला साजरी करू सारे

सुखसमृद्धी आनंद भरभराट व्हावी तुमच्या घरी
तुमच्या आमच्या घरी अशी दिवाळी

येता दिवाळी नवा उत्साह येतो
रागद्वेषांची जळमट स्वच्छ झाडून टाकतो

पंचपक्वान बनवण्याची मजा निराळी
थकवा नाही , दगदग काही वाटत नाही

कारण आपल्याला हे माहित असते
पंचपक्वान नाही तर आनंदाची, सुखदुःखाची हि देवाण घेवाण असते

पूर्वजांपासून चालत आली हि संस्कृती आगळी
आपुलकीच्या नात्याची हि नाजूक वीण वेगळी

अनेक दीप प्रज्वलित अंगणी  माझ्या
शांत मंद समाधानाच्या ज्योती उजळल्या

दीप प्रकाश फक्त नाही माझ्या अंगणात
इतरांचे अंगण देखील होते प्रकाशमान

नाना रंग भरून रांगोळ्या सजल्या
आनंदाची उधळण व्हावी हा संदेश देत आल्या

फटाक्याचा गडगडाटात विरले राग द्वेष सारे
आली दिवाळी चला साजरी करू सारे

सुखसमृद्धी आनंद भरभराट व्हावी तुमच्या घरी
तुमच्या आमच्या घरी अशी दिवाळी नेहमी व्हावी साजरी

सौ सुप्रिया समीर मडये  नेहमी व्हावी साजरी

सौ सुप्रिया समीर मडये