तुझा तो पहिला स्पर्श...

Started by Rushi.VilasRao, November 04, 2019, 07:48:33 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

तुझा तो पहिला स्पर्श अंगावर एक रोमांच उठवून गेला...
तुला मिळवण्याचं स्वप्न माझ्या उघड्या डोळ्यात रंगवून गेला...
स्पर्श तुझा तो पहिला जणू एका  जादुई दुनियेचा प्रवासच होता...
स्पर्श तुझा तो पहिला माझ्या उराला कट्यारी परी घासून गेला...
तुझ्या त्या स्पर्शात मी कितीतरी स्वप्ने पाहत गेलो....
स्पर्शाच्या त्या स्वप्नात मी स्वतः ला निरंतर सामावून घेत गेलो....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)...
हाताचा तुझ्या तो स्पर्श मला निःशब्द अन् स्थब्द करून गेला...
तुझा तो निरागस कोमल स्पर्श मनात माझ्या मुक्या भावनां दाटवत गेला...
तुझा तो पहिला स्पर्श आंगवर एक रोमांच उठवून गेला....
मोहरलेले अंग तुझे...
अन् गालावरची खळी...
ओठांवरील हसू तुझे अन् कपाळी टिकली निळी...
पापण्यांच्या शिंपल्यात मोती नजरेचा जरी...
कितीही करावी स्तुती त्याला शब्द अपुरे तरी...
तो क्षण असा की जणू दवबिंदू पसरले शहारलेल्या गवता वरी...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)...
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan