शंभर भोके

Started by sacchavhan@gmail.com, November 05, 2019, 04:31:30 PM

Previous topic - Next topic

sacchavhan@gmail.com

काय पेरले काय उगवले मोजू कसे
धरतीचे उपकार येवढे मोजू कसे

गाईच्या पाण्यातही रक्तस्त्रावते आता
माहित असून मला विष हे पाजू कसे

कधी निसर्ग,कधी समाज उसवतो
शंभर जागची भोके शिलाईने टाचू कसे

झिजले जोडे,झिजले पाय विनवणीने
नशीब माझे कोणत्या दगडावर घासू कसे

भोंगळा कारभार माझा,नागडा देह मी
पोटाच्या दोन दाण्यासाठी खोटे लाजु कसे

पोशिंदा शेतकरी मी हाडाच्या कष्टाचा
वेश्या परी बाजारी दमडीला नाचू कसे