पंढरी

Started by शिवाजी सांगळे, November 08, 2019, 07:56:50 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पंढरी

स्थान हे पंढरी ! मोक्षाची नगरी !
सकलां उद्धारी ! संसारात !!

कार्तिकीचा मेळा ! भक्तांचा सोहळा !
विठ्ठल सावळा ! दर्शनास !!

लोटता हे जन ! आनंदा उधान ! 
सावळे ते ध्यान ! पाहण्यास !!

लाभ आत्मभान ! होय समाधान !
मोद चिरंतन ! दर्शनाने !!

भेटी जीवा शिव ! लोपे मी-तु आव !
देही मनी भाव ! हरी हर !!

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९