बाजार

Started by शिवाजी सांगळे, November 11, 2019, 08:19:17 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बाजार

मीच खरा सांगत सुटतोय
स्वार्थी आहे जो तो इथला,
नुसता घोळ न् आहे तिढा
सत्ता बाजार आता उठला !

काळजी आम्हा जनतेची
सांगत सगळ्यांना बनवलं,
परंपरा न् आदर्श विसरून
राज्याला गोंधळात लोटलं !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९