हाल आणि चाल

Started by शिवाजी सांगळे, November 12, 2019, 04:24:43 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

हाल आणि चाल

भाऊ, एकशे पंचेचाळीस
कशी जादू कसली नशा आहे?
सत्ता पिपासूंनी दिलेला
जनतेच्या भावनेचा बळी आहे!

दौडतो आम्ही भल्यासाठी
दाखवित सारे इथले पक्ष आहे,
शेतकरी, कष्टकरी बिचारा
सरकारचीच वाट पहातो आहे!

होईल अस्तित्वास धोका
भिती नक्की कुणा वाटत आहे?
घटनेनुसार हालचालीला
आतून कोणाचा पाठिंबा आहे?

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९