एक मन.. एक मेंदु

Started by vpbarde, November 20, 2019, 12:22:57 PM

Previous topic - Next topic

vpbarde

                 हम पढने के लिये एक किताब ढुंढ रहे थे..
              जिंदगी नाम की किताब हमें मिल गई   
           किताब पढने बैठे तो पढते-पढते शाम हो गई   
           कुछ पन्ने अभी भी बाकी है इस किताब के..         
           हमारे ऑखो मे आसुंओ की बरसात थम गई       
            
    आकाश.. खुप काही सांगायचे असते रे.. काही नवं.. काही जुनचं.. असंच काही-बाही.. मनातलं-बिनातंल.. असं वाटंत आत्ता उठावं आणि क्ष्णभरात तुझ्याकडे यावे. खुप भांडावे.. खुप बोलावे.. पण तु तरं माझ्या अबोल्यातुनंही माझ्या मनातलं ओळखणारा आहेस.. काही क्ष्ण पुन्हा-पुन्हा जगावेसे वाटतातं. ते सोनेरी क्ष्ण पुन्हा येत नाहीत. पण मनात माञ त्या आठवणी तश्याच ताज्या राहतातं. ओ.के. चला. कल्प्नेच्या विश्वात रमणे आणि स्व्प्नांचे मनोरे रचणे खुप सोपे असते, मनाला भावणारे असते. मला तरं हया वेडया कल्प्ना आणि स्व्प्न् खुप आवडतांत.
    एक दिवस असंच रोजचा पेपर वाचत होते. हातात रविवारची पुरवणी आणि चहाचा कप होता. एकदम एका विषयावर थांबले.
    रियाज. -- एका नृत्यांगनेची ती मुलाखात होती. भरतनाटयम या नृत्य् प्रकारात निपुण असणारी ही नृत्यांगना दिवसातले 16 तास पायात घुंगरु बांधुन ठेवायची. तिला तिच्या चालण्यात-उठण्या-बसण्यात सगळयामध्येच एक लयबध्दता हवी होती. नृत्य हा तिच्या रोजच्या जगण्याचा एक भाग होता. मग पायातले घुंगरु वेगळे कसे करणार ? घुंगरांशिवाय रियाज कसा होणार ? रियाजा शिवाय नृत्य् अंगी कसे भिनणार ? ती कला आपल्यामध्ये सामावुन जावी आणि आपण त्या कलेमध्ये हरवुन जावे.. हेच ऐक ध्येय होते तिच्या जगण्याचे. ते घुंगरु तिच्याशी बोलतं होते आणि ती त्या घुगरांच्या लयबध्दतेशी संवाद साधत होती. खरंच कला ही मुक्त् असते. वेळ.. जागा.. व्यक्ती.. या सगळयाच्या पलीकडची असते.
    आकाश.. सध्या मी एका नविनच चित्राच्या प्रेमात पडलीय.. एका लेखकानं लिहिता-लिहिता एकादी ओळ अर्धवट लिहुन तिथेच थांबावे आणि तरीही रसिक वाचकांना त्या ओळीचा पुर्ण अर्थ् कळावा.. हे चिञही असेच काहीसे रंग असणारे आहेत. काहीसे धुरस रंग असणारे आणि तरी सुध्दा त्या चित्राला परिपुर्ण करणारे.
    प्रचंड गर्दी आणि सिमेंटची अपार्टमेंट असणारे हे शहर.. आप - आपल्या पिंज-यातले बंदिस्त् जगणे.. पण सहजच खिडकीतुन डोकावुन बघितले आणि ती दिसली. ती.. असेल 70-75 वर्षाची. समोरच्या अपार्टमेंटमध्याल्या एका Flate च्या बाल्कानीत आरामखुर्चीवर बसलेली दिसली. अंगात फुला-फुलाची डिझाईन असलेला सैलसर कॉटनचा गाउन.. गोरा रंग.. आणि कसल्यातरी विचारांच्या जाळयात हरवलेला चेहरा.. कदाचित भुतकाळातल्या काही आठवणीत हरवुन गेलेली असावी. आरामखुर्ची शेजारी छानशी फुलांचीच कुंडी ठेवलेली होती.   
    ब-याच वेळेला मला ती तिथेच दिसते. कधीतरी कोणाशी तरी बोलते. पण बहुतेक वेळा शांतच असते. यार.. मला ही शांतता ना खुप आवडते.. वेड लावते. सगळीकडे नुसता गोंधळ चालु असतो. पण कोणाचा कोणालाच ताळमेळ नसतो. अश्या वेळेस शांत-निशब्द असंणच खरं तरं खुप काही सांगुन जातं.
     आकाश .. मला ना नेहमी वाटतं.. उगवत्या सुर्याला सगळेच नमस्कार करतात. पण थोडस मावळत्या  सुर्यापाशीही थांबाव.. त्यालाही खुप काही सांगायचे असते. ती 70-75 वर्षाची वृध्दा... खुपशे रंग अनुभवले असतील ना तिने.. कधी अपमानाचे काटे टोचले असतील.. कधी मानाचे-कौतुकाचे फुले ओंजळीत पडली असतील.  ओठांवर हसु आले असेल.. तरं कधी डोळयात पाणी..
      खरंच काय विचार करंत असेल रे ती ?? काय चालु असेल तिच्या मनात ?? की नुसतीच शांत-निवांत असेल ?? कोणाची वाट बघतं असेल ?? शायद अब इंतजार करना भी एक आदतं-सी हो गई होगी ??
      OK.. My Best Wishes to that Old lady..  Forgot all the things and welcome to new Start.. आकाश.. निरागस बालपण शहाणं ? सळसळणारं तारुण्य् शहाणं की हे शांत- निवांत वृध्दात्व् शंहाणं ? काही का असेना.. Life is amazing...
      बस.. अश्यांच काही भावनांची ओजळं रिकामी करण्यासाठी मी पुन्हा येईन.. कुठेही असले.. कशीही असले तरी माझे आकाश मला विसरता येणे शक्य् नाही..