समलिंगी

Started by pallson, November 24, 2019, 10:42:12 AM

Previous topic - Next topic

pallson

जेव्हा शोधत होते मी ,
माझ्यातले मी पण,
तेव्हा गवलीस तू अशी मला,
जसे मिळे सिंधुस हे गगन.
कळेना मलाही , न कळे तुलाही,
प्रेम हे आहे सृष्टीत दुर्मिळ ,
परंतु , व्हावे ते एका तरुणीला तरूनिस,
हा नियम निराळा , वाटे शरीर नकोस,
सुटलंय हे कोडं , कोणाला सांगावं तरी कसं.
असती स्त्री-पुरुष इथे अनेक ,
पण प्रेम अपुले हे जगावेगळे ,
मिळावे तरी अपूनास कसे समर्थन,
प्रेम अपुले हे क्षितिजापरी ,
वाटे नभ भेटे जमिनीला आतातरी,
भास हे नुसते , भले येवो कायदे कितीही