एक विस्कटलेली

Started by Mrs. Rashmi Sahasrabudhe, November 24, 2019, 04:44:05 PM

Previous topic - Next topic

Mrs. Rashmi Sahasrabudhe

असच, एकदा चालता चालता,
नजरेस पडली ती l
विस्कटलेल्या केसांची ,
भावनाशून्य डोळ्यांची
बऱ्याच दिवसात अंगाला
पाणी हि न लागलेली ती l
क्षणभर तिच्या डोळ्यात बघताच
काटा आला अंगावर   
म्हटलं असं कस झालं असेल हिचं 
का न राहिली असेल हि भानावर ?
शहाणपणाची सुती मखमली दुलई काढुन,
असे वेड कोणी पांघरले असेल हिच्या अंगावर ?
अर्थात पांघरणारे ते,
दिसणार नाहीतच जगाला कधीच
दिसत राहील फक्त ती
रस्तो रस्ती, गल्लो गल्ली दिशाहीन भटकणारी ती l
श्वास संपायची वाट बघत स्वतःशीच हसणारी
जशि मला दिसते तशी l l   
                                     
                                  - रश्मी गद्रे सहस्रबुद्धे.