शेवटी सारे उडत गेलो

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, November 24, 2019, 04:46:49 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.शेवटी सारे उडत गेलो*

आता आपले हक्क
कोणापुढे मांडू मी
आता नेमक्या कोणत्या
सरकारशी भांडू मी

कधी कोण खुर्चीवर
बसेल सांगता येत नाही
अन रात्रीतून कोण कोण
बदलेल सांगता येत नाही

शेतकऱ्याच्या हितासाठी
घड्याळ हातात घेतलं
पहाटेच्या गाढ झोपेत
कमळाबाईचं गाणं ऐकू आलं

कसा बाणाचा नेम
आता नेमका चुकला
हातानें चिरीमिरी केली
अन सारा गेम हुकला

तुम्ही आम्ही सारे
बळीचे बकरे झालो
आमचा नेता म्हणू म्हणू
शेवटी सारे उडत गेलो

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

harishnaitam

खुपचं सुंदर कविता सत्य परिस्थितीवर आधारित.