क्षण

Started by Mrs. Rashmi Sahasrabudhe, November 24, 2019, 05:09:41 PM

Previous topic - Next topic

Mrs. Rashmi Sahasrabudhe

वाळूच्या कणा  सारखा निसटून जातोय
एक एक क्षण हातून आपल्या ।

त्या क्षणाने आपल्याला काय दिले
ऐवजी आपण त्या क्षणाला काय देतोय हे महत्वाचे ।

कारण क्षण आपल्याला कधीच काही देत नाही
तो येतो आणि विरून जातो ।

त्याच्या त्या विरण्या बरोबर कधी
आपलं दुःख विरत, कधी प्रेम विरत
कधी मनातली जळमट विरतात
कधी नात्यातला ओलावा विरतो ।

असं एक एक करता करता आपला
संपूर्ण जन्म विरतो, बाकी उरतो क्षण
आपल्या जळणाऱ्या शरीराकडे
दुसऱ्यांच्या नजरेतून साक्षीदारा सारखा
बघणारा क्षण .....

कारण आपलं अस्तित्व संपलं असलं तरी
त्याच एका क्षणाचं विरण्या आधीचं अस्तित्व
अभाधित असतं ।

                                    -रश्मी गद्रे सहस्रबुद्धे.