"क्ष" ची किम्मत

Started by शिवाजी सांगळे, November 25, 2019, 06:17:47 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

"क्ष" ची किम्मत

हर एक सोसायटीत
सर्वांच हित पाहिलं जातं
सहकारातून?... पण
काम केलं जातं
तरी सुद्धा प्रत्येक सभेत
'क्ष' कडून आँब्जेक्शन
घेतलंच जातं...विषयाचं गाडं
भरकटवलं जातं !

सहकारास का
हरकतींचा शाप असतो?
दर सभेत गोंधळच
का ठरलेला असतो?
'क्ष' आपलं घोडं
दामटत असतो,
विषय मात्र जागेवरच
घुटमळत बसतो!

संस्था असो वा सरकार?
सहकारावरच ना तगून आहे!
'क्ष' च्या भविष्याचा
विचार करीतच ना...
सर्व कारभार हाकत आहे?

प्रत्येकजण इथे स्वतःची
टीमकी वाजवीत जातो
नेहमीच बिचारा 'क्ष'
उपेक्षितच राहतो,
संस्था/सरकारातला
हर एक जण मात्र
स्वतःच्या लायकी नुसार
'क्ष' ची किम्मत ठरवून जातो!

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९