फुंकर

Started by Mrs. Rashmi Sahasrabudhe, November 26, 2019, 11:41:10 AM

Previous topic - Next topic

Mrs. Rashmi Sahasrabudhe

फुंकर म्हणजे काय तर
ओठांच्या चंबूतून अलवारपणे
बाहेर पडणारी वायुरूपी हवा ।

जी आईच्या मुखातून बाहेर पडली
तर वात्सल्य आणि
त्याच्या मुखातून बाहेर पडली तर
गुलाबी गारवा ।

जिच्या स्पर्शातली भावना एकच, प्रेमाची
पण दोन्हीतला भाव भिन्न
आईच्या फुंकरेत काळजी असते
आणि त्याच्या, लाडिक खोडकरपणा ।

मनाला क्षणात ताजं तवानं करते
शरीराला स्पर्शून जाणारी हि,
इवलीशी हवा

मग ती आईने मारलेली असो वा त्याने
दोन्हीचा स्पर्श नेहमीच वाटतो हवा हवा ।।

                           - रश्मी गद्रे सहस्रबुद्धे.