सातबारा गहाण झाला

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, November 27, 2019, 07:11:58 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.सातबारा गहाण झाला*

माय उन्हा तान्हात
घामान भिजली
लेकरं उपाशी पोटी
सावलीत निजली

तिच्या साडीचा पदर
झाला लेकराची झोळी
तिनं लेकरांसाठी केली
साऱ्या स्वप्नांची होळी

माय उपाशी तापाशी
लेकराची स्वप्नं पेरती
आसवांन तिच्या रे
माती सुगंधी होती

सांग आभाळा देवा
पावसाचा नाही मेळ
का केलास तू देवा
आता मायेचा हा खेळ

कधी येशील तू देवा
माय देण्या उभारी
रघात आटून गेलं
फिटेना कर्जाची उधारी

ज्यांन पोट हे भरलं
त्यो आता इथं नाही
त्याच्या शिवाय आता
हे पोट भरणार नाही

राजकरणात साऱ्या
बाप गेला या मरून
सातबारा गहाण झाला
कसा अंत हा करून

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर