तिच्या दोन वेण्या

Started by Dnyaneshwar Musale, December 03, 2019, 12:01:27 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale


खर सांगु मला
आवडायच्या तिच्या दोन वेण्या
तास संपला की ती
केसांना नुसती मारायची फण्यावर फण्या.
ती मारायची केसांना फण्यावर फण्या
पण तेच चोरून बघायचा जव्हा बण्या
मग मला यायची बण्याची चीड
वाटायचं बण्या माझ्यापेक्षा घेतो की काय जरा जास्त लीड,
खर तर यात माझं शाळेत कशावरच
नसायचं लक्ष,
आज तिने घातल्या की नाही वेण्या
याबाबत मी असायचो जरा जास्तच दक्ष,
वर्ष उलटलं की माझी
व्हायची वर्षभराची हाणी,
वर्ग तोच असायचा पुन्हा
पण वेण्या बदलणार एवढंच असायचं मनी.
त्या वेण्यांवर असायच्या दोन
फुलांच्या रेबीन,
त्या फुलांमध्ये  वाटायचं आपलं असावं
इवलस एखाद प्रेमाचं केबीन,

वेण्या दिसायच्या तिच्या
छान,
म्हणुनच
मी ठेवायचो त्या वेण्यांचा मान.

खरचं मला आवडायच्या तिच्या त्या
दोन वेण्या,
दिसायच्या तिच्या चेहऱ्यावर त्या
गोड  गोजिरवाण्या.