गरीबी

Started by Dnyaneshwar Musale, December 03, 2019, 12:02:52 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

सांगावी कशी तुलं विस्तवाची कथा,
दाह न थांबे
रोज कोण ऐकणार या गरीबीची व्यथा.

टीचभर पोटाशी न मिळे कुठे कुटका,
सांधावा किती कपडा तो फाटका.

उपाशी तपाशी हुडकाव सारं गाव,
झाकावे कसं सांगा पाहु गरिबी हे नाव.

रान माळ पाखरे हे सारे माझे दोस्त,
माणसाशी दोस्ती कराया दोस्ती नव्हे स्वस्त.

या गरीबीला नसे कुठं दवा पाणी,
दुखण्या खुपण्याला गरीबी गाते  अंधारात गाणी.

घटकीभर  गरीबीही
माणसात निजाव म्हणते,
गरीबांच दुख गरीबीच जाणते.

अशी ही गरीबी कुणाच्या न यावं वाट्या,
गरीबीच्या वाट्या नुसत्या असत्यात काट्या रे काट्या.

तरी नशिबाशी एकदा पुन्हा लढाव म्हणतो,
उद्या साठी
आज दिसासोबत थोडं प्रकाशाकडं चढाव म्हणतो.