रोपट व्हायचंय मला...

Started by Rushi.VilasRao, December 08, 2019, 07:54:45 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

रोपट व्हायचंय मला....
रोपट....
दुष्काळाच्या नाकावर टिच्चून माळरानावरच्या तप्त खडकावर अभिमानानं डुलत डुलत उगवणार...
रोपट....
वार वटाळ, अतिवृष्टीच्या पावसात एका निश्चयावर ठाम असल्या प्रमाणे मातीत पाय घट्ट रोवून उभा राहणार....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)...
रोपट....
कितीही मोठं वादळ आल तरी त्याला निर्भिडपणे समोर जाणारे....
रोपट....
तप्त त्या सूर्याकडे पाहत एखाद्या कट्टर निर्धारा प्रमाणे स्वतः ला उंच वाढवत राहणार....
रोपट....
कधी समोरच्या वळणावरून थकत भागत चाललेल्या वाटसरुला प्रेमाच्या छायेची चादर देणार...
रोपट....
भुकेने व्याकूळ झालेल्या वाटसरुला मायेचं विनामूल्य फळ देणार...
रोपट....
कधीही कोणाकडूनही कसल्याही प्रकारची इच्छा अपेक्षा न बाळगता सर्वांना सर्व काही देत रहाणार....
रोपट....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)...
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan