ती कोण आहे?

Started by siddhesh 68, December 08, 2019, 10:06:23 PM

Previous topic - Next topic

siddhesh 68

ती कोण आहे?



खरंच, ती कोण आहे?

माझ्याच ऑफिस मध्ये काम करते

वेगळ्या बिल्डिंग मध्ये बसते

जेवायला माझ्यासोबतच येते

खरंच, ती कोण आहे?



माझ्याबद्दल खुप कुतूहल आहे

स्वतःला खूप मोठे व्हायचे आहे

तरी आपण कुठं तरी कमी आहोत

हि खुणगाठ आहे

आशा मात्र कायम आहे

खरंच, ती कोण आहे?



बऱ्याचदा खळाळुन हसते

केस वारंवार सावरते

मेकअप छान करते

कधीतरी हसताना मात्र

तिचे ओलावलेले डोळे

मी पाहिले आहेत

खरंच, ती कोण आहे?



डीपीला वॉलपेपर क्वचित आंबेडकरांचा लावते

वावरणे मात्र कुलीन आहे

हे त्याबद्दल काही आहे असे वाटत नाही

खरंच, ती कोण आहे?



घटस्फोटिता असल्याचं सांगते

अनेक लोकांशी हस्तांदोलन करते

सध्या बॉयफ्रेंड आहे म्हणते

खांद्यावर हात मात्र माझ्या सारख्या पांगळ्याच्या ठेवते

खरंच, ती कोण आहे?



आली होती एकदा माझ्यासोबत माझ्या घरी

तीन दिवसांनी अंतर्मुख झालो मी

कित्येक वर्षात जे घडले नाही

ते माझ्या घरच्यांना दाखवुन दिले तिने 

खरंच, ती कोण आहे?



मला म्हणते वजन कर कमी

अगं सांगू किती तुला माझी कहाणी

या जन्मात नाही विसरत तुला मी

तु देऊन जाती आहेस मला धडा

तुला गाजर समजू कि अप्सरा

का माझी मेहबूबा

मला काहीच समजत नाही...



खरंच, ती कोण आहे?



Siddhesh Sudhir Deshmukh