न सांगता कळते जे

Started by Prasad8790, December 09, 2019, 05:09:27 PM

Previous topic - Next topic

Prasad8790

सांगावे असं काहीच नाही
लपवावे असेही काही नाही,
न सांगता कळते जे,
लपवून हि उमगते ते,
हो तेच आहे माझ्या मनात...
फक्त तुझ्याचसाठी.....

पाहताना तुला धुंद होतो,
सोबतीत तुझ्या गुंग होतो,
धुंदीत राहताना जे
गुंगीत असताना ते,
हो तेच आहे माझ्या मनात...
फक्त तुझ्याचसाठी.....

कायम असावी तुझी साथ
हातात असावा तुझा हात,
साथ देताना जे,
हात हातात ते,
हो तेच आहे माझ्या मनात...
फक्त तुझ्याचसाठी.....

नात्याला काय नाव देऊ
जगण्यातला आनंद घेऊ,
नात्यात असते जे,
जगण्यास हवे ते,
हो तेच आहे माझ्या मनात...
फक्त तुझ्याचसाठी.....

✍🏻प्रसाद धुमाळ
९/१२/२०१९
बोलणे जमत नाही ते शब्द सांगून जातात..
विषय कोणताही असो निभावून नेतात...

Shrikant R. Deshmane

नात्याला काय नाव देऊ
जगण्यातला आनंद घेऊ,
नात्यात असते जे,
जगण्यास हवे ते,
हो तेच आहे माझ्या मनात...
फक्त तुझ्याचसाठी.....

Khup chan prasad ji
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]