स्वप्नांचा प्रवास

Started by Prasad8790, December 10, 2019, 11:47:20 AM

Previous topic - Next topic

Prasad8790

माझं दिवसाचं जगणं
रात्री स्वप्नांचा प्रवास,
दिवसा भेटण्याची आस,
रात्री तुझाच आभास...

✍🏻प्रसाद धुमाळ
१०/१२/२०१९
बोलणे जमत नाही ते शब्द सांगून जातात..
विषय कोणताही असो निभावून नेतात...

Akash Adbale

आठवण आली कि मन कासावीस होतं
त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं
मन माझं तर वेडच आहे
कसं सावरू ह्या वेड्या मनाला
जे आजून तुझ्यातच रुजलं आहे
तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.

Akash Adbale

.         *✍🏻माझं लेखन 📝*
                   
          *📊अर्थसंकल्प📈*
         
काल रात्री स्वप्नात माझी
अर्थमंत्र्यांची भेट झाली..
काय चाललंय देशात आपल्या
अर्थसंकल्पाची विचारणा केली.. 😊

          म्हणाले चित्र फारच विचित्र दिसतंय
          बजेट मात्र कोटी-कोटीनं वाढलंय..
          तरीही आम्ही बऱ्याच अंशी
         शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तारलंय.. 😊

तुमचं काय म्हणणं आहे
कोणते बदल व्हायला हवेत...
या देशाच्या उन्नतीचे कोणते
प्रश्न घ्यायला हवे कवेत.. 😊

         मीच म्हटलं टेबलाखालच्या
         पैशाचा ही हिशोब लावा..
         देशातल्या अनेक मंत्र्यांनी
         सामान्य जनतेचा केलाय कावा.. 😊

तिकडे एसीमध्ये बसून तुम्ही
नवा-नवा अर्थसंकल्प मांडता..
सामान्य जनतेचे वारंवार
कंबरडे तुम्ही जोरात मोडता.. 😊

          मोठमोठी आश्वासने प्रकल्प
          जाहीर दरवर्षी करता..
          सामान्य जणांच्या अपेक्षा
          किती अंशी पुर्ण करता ?😊

नको असतं आम्हाला
तुमचं दुसरं कांही..
आधी कमी करा
मरणाची महागाई.. 😊

           प्रत्येक गोष्ट महाग पाहुन
           आमचे जीव  दुःखी-कष्टी होतात..
           तुम्हाला काय त्याचं पडलंय
     तुम्हाला तर गलेलठ्ठ भत्ते मिळतात..😊

निवडून दिलंय आम्ही तुम्हाला
या जरा भानावर..
काहीतरी ऊपाय योजा
सारं होतंय अनावर.. 😊

_*लेखक .....आकाश अडबाले

Akash Adbale

*✍🏻माझं लेखन 📝*
                   
*आई जगदंबे मला तुझ्याकडून एक वचन✊🏻 हवंय...😢*

आई जगदंबे आज मला खूप भिती वाटते गं....
आजची परिस्थिती पाहून
माझ्या ताईनं कसं जगावे हाच प्रश्न पडला ?
आई माझी ताई सुरक्षित तर राहिलं ना !😢
नाही तर कुणी रावण येऊन
तिच्या अब्रूवर हात तर
नाही ना घालणार..
तिच्या सौदर्यावर मोहित होऊन
तिचं अपहरण नाही ना करणार कुनी..😢
खरं तर रावणानं मर्यादा पाळली
पण येथे वासनाधिन लिंगपिसाटांना
कुठे आहेत संस्कार आणि निती
तेच तर घरात ही कुसंस्कारीच😡 असतील
जे तान्ह्या बाळाला दुध पाजताना
त्यात पाझरणाऱ्या मातृत्वाला
वासनेच्या टपकणाऱ्या लाळेनी
ते चाटण्यासाठी आतूर असतात...😡
जे लहान मुलींना ही सोडत नाहीत..
रस्त्यावर, शाळेत, काँलेजात
आँफिस आणि प्रवासात
जेव्हा ती एकटी असते ना तेव्हा
ह्दय कापते ग माझं आई... 😭
आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या
स्वराज्यात म्हणजे महाराष्ट्रातच
राहतो ना..
मग विश्वास बसत नाही..
कुणी प्रेमाचं नाटक करून
तीची फसवणूक तर नाही ना करणार !...😢
    आमचा कायदा गुन्हेगाराला कित्येक दिवस भाकरी घालुन पोसायला लावतो अन् नंतर  कधी कधी त्याला निर्दोष समजून सोडुनही दिलं जातं.. 😡
पण आई जगदंबे तुझ्या दरबारात तर न्याय नक्कीच आहे ना..
मग त्या नराधमाचा भर चौकात चौरंग करण्याची या न्यायदान करणाऱ्या लोकांना बुद्धी दे..           
आई मला आज तुझ्याकडून एकच वचन हवंय...
    जसं समाजात कुठेतरी जल्माला येणाऱ्या मुलीला गर्भातच स्वर्ग दाखवला जातो ना...
अगदि तसंच भविष्यात जर काही पुरुष असे निर्लज्ज नराधम होणार असतील तर त्यांनाही ही गर्भातच स्वर्ग दाखव...
  आणि येऊ देत या पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुष भ्रूण हत्येचा विषय...
       आई जगदंबे मला माहीत आहे की तु माझं वचन नक्की पुर्ण करशील...
    आता आम्हीही दररोज दररोज श्रद्धांजली देउन थकलोय गं... 😢
किती दिवस अशा श्रद्धांजल्या देत राहनार.. 😢

~(happy promise day)❌~
*#Bad_promise_day✊🏻*

_*लेखक :- आकाश अडबाले✒🌼*_

MK ADMIN

Akash: Account create kara n mag post kara kavita