एक मन करत तुला भेटु

Started by umesh salunke, December 10, 2019, 01:10:34 PM

Previous topic - Next topic

umesh salunke

एक मन करत तुला भेटु
दुसरं मन म्हणत नको
प्रेमात असा विचार करू
तुझ्या पासून का दूर जाऊ......!

मी तुला हवा आहे
मला तु हवी आहे.
तु येण्याची वाट बघत आहे.....!

एक मन बोलत तुला सगळं सांगून
मोकळं व्हावे दुसरं मन सांगत इतक्या
लवकर नको थोडा विचार कर.....

मला तुला बोलताना प्रश्न पडतो
तु पटकन का निर्णय बदलतो
तु मध्येचं हसतो.
तु मध्येचं शांत होतो.
तुझा चेहरा पाहताना डोळ्यात
अश्रू दाटतो.
का तर उत्तर देताना वेगळंच देतो....!

अग तुझ्या मनातल मला सगळ
कळत होतं.
तुझं हसणं
तुझं रडणं
तुझं मनांत झुरण
तुझ्या शब्दांत माझं अडकून पडणं
तुझ्या प्रेमात जीव गुदमरून गुन्हा
  होऊन बसल्यासारख होणं.........!

एक मन करत तुला भेटु
दुसरं मन म्हणत नको
प्रेमात असा विचार करू
तुझ्या पासून का दूर जाऊ......!

फक्तं तुझ्या भावना वाचण्यात
प्रेम झालं.बाकी फक्तं मन
बदलत राहिलं.......!

तुमच्या बाबतीत झालं आहे का...?

:mad: :mad: :mad: :'( :'( :'(

Shrikant R. Deshmane

मला तुला बोलताना प्रश्न पडतो
तु पटकन का निर्णय बदलतो
तु मध्येचं हसतो.
तु मध्येचं शांत होतो.
तुझा चेहरा पाहताना डोळ्यात
अश्रू दाटतो.
का तर उत्तर देताना वेगळंच देतो....

He bharich lihlay...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]