विरह

Started by Shweta261186, February 26, 2010, 11:46:36 AM

Previous topic - Next topic

Shweta261186

पक्षी होऊनी ऊड्ण्या मन हे सरसावले
नवा गंध हा हूंगण्या मन हे वेडावले
वा‍‍र्‌यावरती झूलण्या मन हे झेपावले
कूणास बघूनी मग हे इथेच थबकले


मनात माझ्या अलगद कोण हे शिरले
मनाचा माझ्या ताबा घेऊनी हसत बसले
आता माझे मन माझे न राहिले
कुणास भुलूनी हे स्वत:शीच हरले


करु नये तीच चूक या मनाने केली
स्वत:चे अस्तित्व विसरुन त्याच्या सुखाची चिंता केली
आनंदात त्याच्या स्वत:चे हास्य शोधले
त्यानं दिलेले अश्रु त्या हसण्यातच लपवले

या मनानं न जाणो त्याला
किती हसवले अन् किती रडवले
पण त्याने हास्य तेवढे अलगद्‍ टिपले
अन् अश्रु ते सोडून दिले


माझे मन वेडे ते वेडेच ठरले
हे अश्रुच त्याने अलगद्‍ झेलले
आठवणीत त्याच्या
एकटेच झुरले


                    श्वेता देव...

PSK


Parmita


santoshi.world

#3
छान आहे आवडली  :)  ........

करु नये तीच चूक या मनाने केली
स्वत:चे अस्तित्व विसरुन त्याच्या सुखाची चिंता केली
आनंदात त्याच्या स्वत:चे हास्य शोधले
त्यानं दिलेले अश्रु त्या हसण्यातच लपवले....

Prachi

khup chaan prakare sangitlay virah....

Prasad Chindarkar


Shweta261186