वाट चुकलो आहे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, December 17, 2019, 08:15:48 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.वाट चुकलो आहे*

कोणाशी कोणाला मी मागतो आहे
उगाच तोफ प्रेमाची मी डागतो आहे

तू मिळणार नाहीस माहीत मला जरी
तरी आठवणी तुझ्या मी राखतो आहे

तू दिलेल्या स्वप्नांवर जगतो असा ही
लेखणी हाती येता तसा मी पांगतो आहे

विरहाचे गीत माझ्या उशाला खेळतांना
मढे काळजाचे वेशीला मी टांगतो आहे

प्रेमाचं काय बोलू तुम्हाला यार हो आता
खोटे भाव चेहऱ्याचे आता मी दावतो आहे

नीट पाहून घ्या एकदाचे या वेड्याला जरा
अंतरातून पुन्हा तुम्हाला मी सांगतो आहे

आज काल जराशी वाट चुकलो आहे
मरण येईल लवकर असा मी वागतो आहे

✍🏻(कविराज. अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर