हो आज तिला मी पाहिलं

Started by Manojshirke, December 17, 2019, 11:15:47 PM

Previous topic - Next topic

Manojshirke

हो आज तिला मी पाहिलं
कदाचित हे शेवटचं पाहिलं
आज पर्यंत जीला मी चुडीदार मध्ये पाहिलं
तिला आज सजवलेल्या मंडपात लग्नाच्या शालू मध्ये पाहिलं
हो आज तिला मी पाहिलं
आज पर्यंत जिला मी साध्या रूपात पाहिलं
तिला आज मी नटून सजून शालुमध्ये लग्न मंडपात येताना पाहिलं
हो आज तिला मी पाहिलं
काही वर्षांपूर्वी आम्ही सोबत आयुष्याची सुरुवात करायचं स्वप्न पाहिलं
आणि तिला आज मी कुणा दुसऱ्या बरोबर नव्या आयुष्याची सुरावात करताना पाहिलं
हो आज तिला मी पाहिलं
कदाचित शेवटचं पाहिलं
ज्या सप्त पदी आम्ही सोबत हतात हात घेवून पूर्ण करायच्या स्वप्न पाहिलं
त्याच सप्त पदी तिने दुसऱ्या कोणाचा तरी हातात हात घेवून पूर्ण करताना पाहिलं
हो आज तिला मी पाहिलं
सोडल होत लिहीन संपवले होते सगळे शब्द
करताना ती डायरी बंद स्वतःला शेवटचं पाहिलं होत
खूप दिवसांनी आज स्वतःला पुन्हा एकदा लिहिताना पाहिलं होत
हो आज तिला मी पाहिलं होत
कदाचित शेवटचं पाहिलं होत...
- मन