मन रमत नाही

Started by SahyadriN, December 23, 2019, 02:05:09 PM

Previous topic - Next topic

SahyadriN


या शब्दांच्या शहरात
आता मन रमत नाही
आठवणीच्या गर्दीत
मला काही करमत नाही

लाखो चेहेरे सारखेच इथे
ओळखीचा एकही वाटत नाही
शोधू कोणी ओळखेल का मला
माझीच सुरत मला आठवत नाही

तिच हवा तोच गंध
सुगंध तो श्वासात माझ्या दरवळत नाही
जूनं आभाळ जुना काळोख
उजेड नवा तो कुणाच्या मनात नाही

आकार उकार नेहमीचे परी
शब्दाला शब्द जुळत नाही
कोरया कागदावर शिंपले जरी
अक्षरांना अर्थही मिळत नाही
NPD23122019