सोन्याचा गोळा (बालकविता)

Started by Balaji Lakhane (guru), December 25, 2019, 12:12:57 PM

Previous topic - Next topic

Balaji Lakhane (guru)

सोन्याचा गोळा...

प्रकाश देवूनी धरतीला
वरती लाजतोय भोळा.!
डोंगराच्या पाठीमागे,
लपलाय सोन्याचा गोळा.!

पाना फुलांतून कधी तू,
नभा नभातून वाहतो.!
सांग जरा रे तू मजला,
असे का ?भिरभिर फिरतो.!

नाही तुझ्याकडे सायकल,
अन नाही तुझ्याकडे गाडी.!
चलत फिरतो पळत फिरतो,
का? तुज फिरण्याची गोडी.!

कधी वाटते तू जवळी
कधी वाटतो लांब.!
अंतर किती आपल्यात
मला भेटून खरे खरे सांग.!

चॉकलेट देऊ की बिस्कीट
गोळ्यांचं तुला पॉकिट देतो.!
सांग तुझे कुठे आहे घर.!
सगळं खाऊ तुला पाठून देतो.!

@बालाजी लखने (गुरु)
  उदगीर जिल्हा लातूर
  भ्र...८८८८५२७३०४