शाळा

Started by Dnyaneshwar Musale, December 25, 2019, 02:43:55 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

माझी ती गावातली कौलारू शाळाच बरी होती,
ती
शिक्षणानं खरी होती.

अरे भिंती होत्या
बांधलेल्या जरा कच्च्या,
खर तर तिथंच घडायच्या
आयुष्याच्या पायऱ्या पक्क्या.

शाळेचा डिजिटल नाही
पण बोलक्या असायच्या
भिंती आणि फळा,
फुलायचा तिथंच
ज्ञानाचा सुंदर मळा.

शाळेत असायचे गुरुजी
असायच्या बाई,
जणु मायेनं गोंजणारी दुसरी आई.

नव्हत्या कधी शाळेत लाद्या
की बसायला बाक,
आज ही आनंद वाटतो
ऐकून गुरुजींची हाक.

पुस्तकात धडा वाचावा तसे
गुरुजी वाचायचे आमचे चेहरे,
घरी कितीही गरिबी असली
तरी गुरुजी  घडवायचे  खण खणीत मोहरे.

शाळेतली  मित्र म्हंजी
मौज मस्तीचा  खाऊ,
किती गोड वाटायचं
तेव्हा
सारे मिळून गायचो कविता
आम्ही सारे बहिण भाऊ.

शाळेला सुट्टी म्हणुन
मित्र घ्यायचे कट्टी
आईतवारीही चिचच्या माळाव
भेटायच,
इतके होते हट्टी.

चिप्स, बिस्कीट कसलं
काय होतं डब्यात,
पोर कितीही भांडखोर
असली तरी शिक्षकांच्या असायची ताब्यात.

कितीही रेमटवला
पोराला शाळेत,
तरी पोरग दुसऱ्या दिशी
हजरचं असायचं  शाळेच्या वेळेत.

छडीचाही जबर धाक
असायचा,
म्हणुनच की काय वार्ताफलकावर
अनेकांना घडवल्याचा दाखला दिसायचा.

खरचं
आजही
लावते लळा,
ती आवडते मला माझी शाळा.

ज्ञानेश्वर मुसळे